Friday, June 5, 2020

शब्द

शब्द शेवटी शब्द राहिले
मनातल्या मनात वाहिले
बोलायचे तसेच राहिले
शब्द शेवटी शब्दच राहिले

मनातल्या शब्दांना डोळ्यात आनिले
डोळ्यातील शब्दांचे अश्रृहि वाहिले
कळायचे तिला तसेच राहिले
शब्द शेवटी शब्दच राहिले

र्स्पशहि शब्द बनुन आले
नजरेन सुद्धा तसेच कळविले
तिच्या शब्दात माझे शब्द असे गुरफटले की
शब्द शेवटी शब्दच राहिले

ओठावरील गाण्याने मनातल्या शब्दांचे तार छेठले छेडले
हस्यात सुद्धा शब्दच होते दडले
मनातल्या भावनात सुद्धा शब्दच होते
पण तिला कधी मनातल्या भावनाचे मेळच जुळवता नाहि आले
शब्द शेवटी शब्दच राहिले

शेवटी हिंमत करुन बोलायचे ठरवले
शब्द हि शेवटी ओठावर आणले
पण तिच्या त्या स्मित हास्याने असे फसविले कि
मि माझे बोलायचे शब्दच विसरले
परत शब्द शेवटी शब्दच राहिले...


// राहुल कदम

शब्द

शब्द शेवटी शब्द राहिले मनातल्या मनात वाहिले बोलायचे तसेच राहिले शब्द शेवटी शब्दच राहिले मनातल्या शब्दांना डोळ्यात आनिले डोळ्यातील शब्दांचे अ...